सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चार भिंतीच्या आत अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात काही अपमानजनक बोलल्यास किंवा कुठलाही साक्षीदार ज्या गोष्टीबाबत नसेल, अशी घटना अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकत नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच याचिकाकर्त्यांविरोधात यासंदर्भात अॅट्रॉसिटींतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ? हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप उत्तराखंडमधील एका महिलेने केला होता. पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात त्या आधारावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करताना सांगितले की, सर्व प्रकारचा अपमान आणि धमक्यांचा अंतर्भाव अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये होत नाही. तर ज्यामध्ये पीडित व्यक्तीला समाजासमोर अपमान, शोषण आणि त्रासाचा सामना अशा घटनांचा या कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. पीडित आणि आरोपींव्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या उपस्थितीत या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा घडणे आवश्यक आहे. ? संबंधित घटनेचे पुरावे पाहिल्यास अॅट्रोसिटी कायदा अधिनियमामधील कलम ३(१) (आर) नुसार गुन्हा घडलेला नसल्यामुळे या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने सांगितले. अन्य कलमांनुसार आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवता येऊ शकतो.
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना निलंबित करा: डॉ.विजय मकासरे यांची पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे...
अकोलेचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना निलंबित करा
डॉ.विजय मकासरे यांची पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
‘फाशी झाली तरी खेद नाही, जन्नतमध्ये हुरडा मिळेल,’ श्रध्दाचा मारेकरी आफताब पॉलीग्राफ चाचणीत सांगतो,...
दैनिक जागरण, आफताब अमीन पूनावाला यांच्या हवाल्याने पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी...
ताजपुरिया हत्येनंतर निलंबित: तिहार तुरुंगात तामिळनाडूचे पोलीस का तैनात करण्यात आले?
आशियातील सर्वात मोठे तुरुंग 2,400 किलोमीटरहून अधिक अंतरावर असलेल्या राज्यातील अधिकाऱ्यांनी का पहारा दिला आहे?याचे उत्तर 1976...
जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान यंत्रांची प्रथम तपासणी सुरू, 6 हजार मतदान यंत्रे उपलब्ध
अहिल्यानगर - गेल्या साडेतीन वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासन...



