अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नविन मुख्य जलवाहीनी ( ११०० एम. एम. ) शिंगवे गाव ते देवनदी दरम्यान अंतरात पाण्याच्या व हवेच्या दाबाने लिकेज झालेली आहे.

763
  • आज रविवार दि.२५/०४/२०२१ रोजी दुपारी अहमदनगर शहर पाणी पुरवठा योजनेची नविन मुख्य जलवाहीनी ( ११०० एम. एम. ) शिंगवे गाव ते देवनदी दरम्यान अंतरात पाण्याच्या व हवेच्या दाबाने लिकेज झालेली आहे.
  • सदर जलवाहीनी दुरुस्तीचे काम सोमवार दि. २६/०४/२०२१ रोजी मध्यवर्ती शहरातील पाणी वाटप झाले नंतर म्हणजेच सकाळी ११.०० वाजलेनंतर हाती घेण्यात येणार आहे.
  • जलवाहिनी दुरुस्तीचे काम विस्तृत स्वरूपाचे असल्याने त्यास अवधी लागणार आहे.
  • त्यामुळे सोमवारी शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य होणार नाही.
  • परिणामी मंगळवार दि २७/०४/२०२१ रोजी रोटेशन नुसार शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास उदा . झेंडी गेट, सर्जेपुरा, मंगलगेट, कचेरी परिसर, हातमपुरा’ रामचंद्र खुंट’ कोठला’ माळीवाडा’ इ .भागाचा पाणी पुरवठा बंद राहाणार असुन तो दि.२८/०४/२०२१ रोजी नेहमीच्या वेळेत करण्यात येईल.
  • तसेच बुधवार दि.२८/०४/२०२१ रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागाचा उदा . सिद्धार्थ नगर ‘ लालटाकी’ दिल्लीगेट’ चितळे रोड, तोफखाना, नालेगांव ‘ कापड बाजार , आनंदि बाजार, नवीपेठ, माणिक चौक इ. भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार असून या भागास गुरवार दि २९/०४/२०२१ रोजी पाणी पुरवठा करण्यात येईल .
  • तरी नागरीकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. असे आवाहन महानगर पालीकेने केलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here