अहमदनगर यतीमखाना संस्थेचे कार्य कौतुकास्पद : शेखर पाटील
अहमदनगर : यतीमखाना संचालित अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम) विद्यालयात जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून मिळालेल्या ओपन जिम साहित्याची पहाणी करण्यासाठी धावती भेट दिली असता त्यांचा संस्थेचे संचालक मा उबेद शेख यांच्या हस्ते पुष्प गुच्छ , शाल देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी क्रीडा कोच मा. ज्ञानेश्वर खुरंगे साहेब व विद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी शेखर पाटील यांनी आमच्या कार्यालयामार्फत दिलेले साहित्य योग्य संस्थे ला देण्यात आले आहे.प्राचार्यांनी संस्थेच्या प्रगती बाबत सांगितलेल्या माहितीवरून स्पस्ट झाले आहे असे मला वाटते . विद्यालयात अनाथ गोरगरीब विद्यार्थी या साहित्याचा लाभ घेतील याचा मला अभिमान वाटतो यावेळी शाळेची पहाणी केली असता विद्यालयातील स्वच्छता शिस्त नजरेत भरण्यासारखी आहे विद्यालयाच्या उज्ज्वल भविष्या साठी शुभेच्छा दिल्या भविष्यात संस्थे ला कुठल्याही अनुदानाची गरज भासल्यास आमचे कार्यालय तत्पर राहील