गणेशोत्सवासाठी नियमावली
• घरगुती गणेशाची मुर्ती ही २ फूट तर सार्वजनिक मंडळासाठी ४ फुटांच्या मूर्तीची परवानगी.
• गणेशोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी गरजेची. कोरोनाचा संसर्ग पाहून उत्सव साधेपणाने साजरा करावा.
गणेश मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात करावे, शक्यतो शाडूच्या मातीची मूर्ती ठेवावी.
गणेशोत्सव मंडळांनी नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी.
गणेशोत्सवादरम्यान मंडळ परिसरात होणारी गर्दी टाळावी.
सांस्कृतीक उपक्रमाऐवजी आरोग्यविषयक जनजागृती करणारे कार्यक्रम राबवावेत.
आरती, भजन किंवा किर्तन या कार्यक्रमांना होणारी गर्दी टाळावी.
नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनींगची व्यवस्था करण्यात यावी.
