दिनांक: ०9 ऑक्टोबर 2020, रात्री 7 वाजता आतापर्यंत 44 हजार 603 रुग्ण बरे होऊन परतले घरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.78 टक्के आज 745 रुग्णांना डिस्चार्ज तर 511 बाधितांची रुग्णसंख्येत भर अहमदनगर (दिनांक: ०9 ऑक्टोबर 2020) : जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 511 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 4304 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 117, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 126 आणि अँटीजेन चाचणीत 268 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 45, अकोले 15, जामखेड 03, कर्जत 04, कोपरगाव 08, नगर ग्रामीण 14, नेवासा 02, पारनेर 05, पाथर्डी 03, राहाता 03, राहुरी 03, श्रीगोंदा 06, मिलिटरी हॉस्पिटल 05 इतर जिल्हा 01अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 126 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 46, अकोले 01, जामखेड 03, कर्जत 02, कोपरगाव 02, नगर ग्रामीण 15, नेवासा 09, पारनेर 03, पाथर्डी 06, राहाता 09, राहुरी 12, संगमनेर 07, शेवगाव 03, श्रीरामपूर 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 268 जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा 17, अकोले 14, जामखेड 23, कर्जत 17, कोपरगाव 08, नेवासा 09, पारनेर 10, पाथर्डी 46, राहाता 12, राहुरी 17, संगमनेर 53, शेवगाव 14, श्रीगोंदा 07, श्रीरामपूर 11 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 136, अकोले 32, जामखेड 63, कर्जत 47, कोपरगाव 19 नगर ग्रा. 47, नेवासा 44, पारनेर 35, पाथर्डी 43, राहाता 49, राहुरी 39, संगमनेर 70, शेवगाव 44, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 41, मिलिटरी हॉस्पिटल 08 अशा रुग्णांचा समावेश आहे. बरे झालेली रुग्ण संख्या=44603 उपचार सुरू असलेले रूग्ण=4304 मृत्यू=771 एकूण रूग्ण संख्या=49678 (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय...
गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार साहेब, मुख्यमंत्री मा. उद्धव...
‘राहुल गांधी, पंतप्रधान मोदींचे मोठे हृदय पहा’: रवी किशन बंगल्यावर; ‘त्याचा दडीहल नाही’
लोकसभा सदस्यत्व पुनर्संचयित केल्याच्या एका दिवसानंतर राहुल गांधींना त्यांचे खासदार निवासस्थान, 12 तुघलक लेनचा बंगला परत मिळाला,...
Burglary : पैशांसाठी नातंही विसरला; बहिणीच्या घरात भावानेच केली लाखाे रुपयांची घरफोडी
Burglary : नगर : नगर एमआयडीसी परिसरातील बहिणीच्या घरी घरफोडी (Burglary) करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने मोठ्या शिताफीने...
माजी नगरसेवक शेख मुदस्सर यांच्या नेतृत्वाखाली मंगल गेट परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
अहमदनगर - राज चेंबर ते मंगल गेट परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे या मागणीसाठी माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद यांच्या नेतृत्वाखाली...




