अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत इतकी वाढ यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ झाली #Covid19 #Ahmednagar अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत इतकी वाढ यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ झाली *दिनांक: ३० सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा* *आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन परतले घरी* *रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२२ टक्के* *आज ४७३ रुग्णांना डिस्चार्ज तर ६७४ बाधितांची रुग्णसंख्येत भर* *अहमदनगर*: जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.२२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६७४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४४६७ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ६९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२८ आणि अँटीजेन चाचणीत ३७७ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३१,अकोले १२, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०२, नेवासा ०५, पारनेर ०६, पाथर्डी ०१, राहुरी ०१, संगमनेर ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२८ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५७,अकोले ०८, जामखेड ०५, कर्जत ०५, कोपरगाव ०७, नगर ग्रामीण २६, नेवासा १३, पारनेर १३, पाथर्डी ०५, राहाता १२, राहुरी २०, संगमनेर २७, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज ३७७ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ३२, अकोले १८, जामखेड ३०, कोपरगाव २३, नगर ग्रामीण ५२, नेवासा ४०, पारनेर ११, पाथर्डी १९, राहाता ३६, राहुरी १६, संगमनेर ३९, शेवगाव २१, श्रीगोंदा २१, श्रीरामपूर १७, कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. आज ४७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९, कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे. * बरे झालेली रुग्ण संख्या=३८८३८ * उपचार सुरू असलेले रूग्ण=४४६७ * मृत्यू:७१८ * एकूण रूग्ण संख्या=४४०२३ * (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर) *घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा* *प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा* *स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या* *अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा* *खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
ताजी बातमी
अहिल्यानगर शहरात माळीवाडा, सारसनगर परिसरात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार
अहिल्यानगर - शहरातील माळीवाडा परिसरातील कपिलेश्वर चौकात धंद्याच्या वादातून राडा झाल्याची घटना घडली. लोखंडी फायटरने तरुणावर हल्ला...
महाराष्ट्रात एमआयएनं 125 जागा जिंकल्या, असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया, विजयी नगरसेवकांना महत्त्वाची सांगितली गोष्ट…
महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसींच्या एम एमआयएमनं महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली...
…….म्हणून अजित पवारांना मराठ्यांचे मतदान पडले नाही; जरांगे पाटलांनी सांगितलं पराभवाचं राज’कारण’
राज्यातील महापालिकांच्या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत, आता जिल्ह्याच्या परळीतील मिरवट येथे आज मराठा आंदोलक मनोज...
चर्चेत असलेला विषय
राज्यातील वीज भारनियमनावरुन केंद्र आणि राज्याच्या नव्या संघर्षाचा अंक सुरु
मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारचा संघर्ष गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे. जीएसटीचा परतावा येथून सुरू झालेला हा संघर्ष कोविड काळात...
ममता बॅनर्जींविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार; राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप
ममता बॅनर्जींविरोधात मुंबईत पोलिसात तक्रार; राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप
Mumbai:
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता...
“पाक लोक भारताला शत्रू मानत नाहीत”: काँग्रेसचे मणिशंकर अय्यर
नवी दिल्ली: पाकिस्तानशी संवाद पुन्हा सुरू करण्यासाठी फलंदाजी करताना मुत्सद्दी-राजकारणी बनलेले मणिशंकर अय्यर म्हणतात की जोपर्यंत आपला...
‘कुंकुमार्चन’ ह्या लघुपटची नामांकित “35th Oscar Qualifying Edmonton International Film Festival” मध्ये अधिकृत निवड
'कुंकुमार्चन' ह्या लघुपटची नामांकित "35th Oscar Qualifying Edmonton International Film Festival" मध्ये अधिकृत निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल Academy Award आणि Canadian...





