अहमदनगर जिल्हयातील न्यायालयांमध्ये रविवार दि. ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले

1026

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, अहमदनगर, बार असोसिएशन अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. ०१ ऑगस्ट, २०२१ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले.

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अॅक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादावी प्रकरणे, वीज महावितरणची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. लोकअदालतमध्ये आभासी पध्दतीने उपस्थित राहून तसेच प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये देखील लोकन्यायालयामध्ये हजारो प्रकरणे मिटविण्यात आली. जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये कोव्हीड १९ नियमांचे तंतोतंत पालन करून नागरीकांची प्रकरणे आपसामध्ये समझोता करून मिटविण्यात आली. मैत्री दिनाच्या दिवशी बरेच नागरीक मैत्रीच्या संबंधासह आपसातले वाद मिटवून हसत बाहेर जाताना दिसून आले. अहमदनगर जिल्हयामध्ये ६९१० दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर ३८६० प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा करण्यात आला. तसेच ७३,८०, ३४, २९३/- रकमेची वसुली करण्यात आली. जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे हे लोक अदालत अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर मा. श्री. सुधाकर वें. यार्लगडडा व जिल्हा न्यायाधीश क. १ श्री. मिलींद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष श्री. भुषण ब-हाटे, सरकारी वकील श्री. सतीश पाटील, सेंट्रल बार असोसिएशन प्रतिनिधी अॅड. सोनी व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले. बँका व महानगरपालिका यांची दाखलपुर्व प्रकरणे मिटवण्यात आली. सदरचे लोकन्यायालय न्यायाधीश, वकील, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरितीने पार पडले. कोव्हीड १९ रोगाचा प्रादुर्भाव असतांनादेखील जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस उदंड प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here