अहमदनगरच्या कुंकुमार्चन ला बेस्ट फिल्म जुरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कलाकारांचा सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला

894

अहमदनगरच्या “कुंकुमार्चन” या लघुपटाला ११ वा दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सव – २०२१ मधील “बेस्ट फिल्म जुरी” हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल “कुंकुमार्चन” च्या सर्व टीमचे समस्त शहरवासीयांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या मानाच्या पुरस्कारामुळे शहरातील मनोरंजन क्षेत्रातील नाटक-चित्रपट निर्माते तसेच कलाकारांना आणखी जोमाने काम करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन मिळेल, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले .


दरवर्षी जगाच्या पाठीवरून अनेक देशातून शेकडो सिनेमे या महोत्सवात भाग घेतात. यंदाच्या वर्षी ६०० सिनेमे वेगवेगळ्या श्रेणी मधून सहभागी झाले होते.
“कुंकुमार्चन” हा लघुपट आई आणि दिव्यांग मुलाच्या जीवनावर आधारित आहे. अहमदनगरचे नाट्य सिनेमा लेखक श्री अभिजीत दळवी यांचं हे पहिलं दिग्दर्शन असून लघुपटाची मूळ कथा ही श्री कौस्तुभ केळकर यांची आहे. कथा विस्तार, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अभिजीत दळवी यांनी केले आहे. या लघुपटातून श्री पुष्कर तांबोळी श्री प्रणित मेढे श्री अभिजीत दळवी यांनी निर्मितीचे पहिले पाऊल टाकले आहे. या लघुपटाचे निर्मितीमूल्य उत्तम होण्यासाठी श्री नरेंद्र फिरोदिया यांचे फार मोठे योगदान लाभले असून प्रस्तुतीसाठी अनुष्का मोशन पिक्चर्स & इंटरटेनमेंट ने काम पाहिले असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. लघुपट चित्रीकरणासाठी श्री शशिकांत नजान , अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि श्री अमोल खोले, अध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद अहमदनगर यांचे सहकार्य लाभले आहे. याप्रसंगी श्री अमोल खोले, श्री पुष्कर तांबोळी, श्री अभिजीत दळवी, श्री प्रणित मेढे, श्री सौरभ कुलकर्णी, श्री विवेक जोशी, श्री विजय मस्के, श्री सुदर्शन कुलकर्णी आदी कलाकार उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here