अस्सल कोल्हापुरी स्टाईल आख्खा मसूर
साहित्य :-
अक्खा मसूर १ वाटी
ओला नारळ अर्धी वाटी
लसूण ८-९ पाकळ्या
आले २ इंच
कोथींबीर अर्धी वाटी
१ हिरवी मिरची
अर्धा चमचा कांदा लसूण मसाला
लाल तिखट चवीनुसार
दालचिनी, लवंग, काळी मिरी, धने, जिरे, पावडर १ चमचा
तमालपत्र ३-४ पाने
मध्यम आकाराचा १ कांदा
आमसूल ३-४ तुकडे
पाणी आवशक्यतेनुसार
तेल ३-४ चमचे
कृती :-
सर्वप्रथम अख्खा मसूर ३-४ तास पाण्यात भिजत ठेवावा.
नंतर स्वछ धुवून कुकरमध्ये थोडे पाणी घालून २ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावा.
ओले खोबरे, लसूण, आलं, कोथंबीर आणि १ हिरवी मिरची यांची पेस्ट करून घ्या.
दालचिनी, लवंग, काळी मिरी, धने आणि जिरे तव्यावर हलकेसे परतून घ्या आणि त्याची पावडर बनवून घ्या.
कढईमध्ये २-३ चमचे तेल घालून त्यामध्ये तमालपत्र, १ बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा कांदा गुलाबी झाला कि त्यामध्ये तयार मसाल्याची पेस्ट घालावी आणि चांगली परतून घ्यावी.
नंतर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार लाल तिखट आणि तयार गरम मसाला पावडर घालून अजून १ मिनिटभर परतावे नंतर त्यामध्ये शिजलेल्या मसूर मधून पाव भाग मसूर मॅशर ने मॅश करून घालावा व उरलेला शिजलेला अक्खा मसूर तसाच घालावा आणि नीट मिक्स करून घ्यावे चवीनुसार मीठ घालावे.
एका पातेल्यात आमसूल आणि मसूर मध्ये घालण्यासाठी जेवढे पाणी हवे तेवढे घालून उकळून घ्यावे आणि हे उकळलेले पाणी मसूरच्या भाजीमध्ये घालून भाजी ५-१० मिनिटे उकळू द्यावी.
गरम गरम अक्खा मसूर तंदुरी रोटी आणि जिरा राईस सोबत सर्व्ह करावा.