अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या भरधाव डंपरने पत्रकार तरुणीला चिरडले वडिल गंभीर जखमी

702

अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या भरधाव डंपरने पत्रकार तरुणीला चिरडले वडिल गंभीर जखमी

अवैध वाळू वाहतुकीचा आणखी एक बळी

टाकळी ढोकेश्वर रस्त्यावर शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने ( एमएच १६ सीए ७२९७ )समोरून येणाऱ्या स्कुटी क्रमांक एम एच १्६ बीआर६१७८ला जोराची धडक दिल्याने संपदा सुरेश साळवे (वय २६) या पत्रकार तरुणीचा जागीच मृत्यू झाला.

यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कान्हूर पठार येथून वाळू वाहतूक करणारा मोकळा डंपर भारधाव वेगाने चालला होता. टाकळी ढोकेश्वर घाटात समोरून येणाऱ्या स्कुटीला भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोराची धडक दिली.

मिळालेल्या माहितीनुसार समोरून दुचाकी आल्याचे चालकाच्या लक्षात आले, मात्र वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने डंपरने जोराची धडक दिली त्यात पत्रकार कु . संपदा सुरेश साळवे ( वय २६ वर्ष )तरुणीचा मृत्यू झाला. तर वडील सुरेश रतन साळवे ( वय ४९रा . कान्हुर पठार ता .पारनेर ) हे गंभीर जखमी झाले आसुन त्याना उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले आहे.
या संदर्भातील फिर्याद शशिकांत साळवे यानी पारनेर पोलिसात दिली आसुन घटनेची माहीती समजताच कान्हूरपठारचे सरपंच गोकुळ काकडे ग्रांप सदस्य बापु चत्तर उपसरपंच सागर व्यवहारे कांतीलाल साळवे , सचिन ठुबे नामदेव ठुबे अमोल ठुबे , देवदत्त साळवे पत्रकार संजय मोरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाहीसाठी मदत केली

पारनेर तालुक्यात सध्या 43 गावांमध्ये कडक लॉक डाऊन ची अंमलबजावणी सुरू असून सर्व व्यापारी वर्गाला बंधने घातली असताना देखील वाळू वाहतूक अर्थपूर्ण आशीर्वादाने मात्र चालू ठेवण्यात आली आहे. या वाळू वाहतुकीने आतापर्यंत कित्येक असे बळी घेतले आहेत. वाळू वाहतूक करणारे ड्रायव्हर हे रस्त्याने चालताना अक्षरशा कुठल्याही वेगाच्या नियंत्रणात चालत नाही तसेच ते मोबाईल वर बोलत गाडी चालवत असतात त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

         या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात येऊन मृतदेह ताब्यात घेण्यात येऊन शवविच्छेदनासाठी पारनेर येथे पाठविण्यात आला आहे. अपघात झालेल्या घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांची व वाळू तस्करांची मोठी गर्दी झाली होती. 

आज अपघात झाला या अपघाताला नेमके जबाबदार कोण महसूल प्रशासन की पोलीस प्रशासन. दोन दिवसापूर्वीच अहमदनगरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी पारनेर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला..लॉकडावूनची काटेकोर पणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असताना देखील पारनेर तालुक्यात काहींच्या अर्थपूर्ण आशीर्वादाने मात्र वाळू वाहतूक असेल किंवा धाबे, हॉटेलवर दारू विक्री हि राजरोस पणे चालू असल्याचे चित्र दिसत आहे..या अवैध व्यवसायिकांना कोणत्याही अधिकाऱ्याची भीती नसल्याचे दिसतआहे.

.जिल्हाधिकारी मा.राजेंद्रजी भोसले साहेब आणि पोलिस अधीक्षक मा.मनोज पाटील साहेब आता आपणच पारनेर तालुक्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here