अल्पवयीन मुलीला दारू पाजून बलात्कार

पुणे – दि. १६ डिसेंबर -अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना डेक्कन परिसरात घडली आहे.

मुलीच्या आईच्या तक्रारी वरून आरोपी साहिल विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डेक्कन परिसरात राहणाऱ्या एक महिलेने डेक्कन पोलिसात तक्रार नोंदवली होती की तिच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला साहिल नावाचा युवक जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर घेऊन गेला. तो तिला एका लॉजवर घेऊन गेला. तिथे त्याने तिला जबरदस्तिने वोडका दारू पाजली आणि तिच्यावर बलात्कार केला त्याच्यावर ३७६, ३६३, ३६६ या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर महिलेच्या तक्रारीवरून साहिल याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here