
प्राप्त माहितीनुसार, ASI अब्दुल कलाम हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांना एका चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या पोटावर आणि छातीवर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांची नावे फाजील खान साबीर खान, जियान उद्दीन ऐसान उद्दीन (वय 22), आणि आवेज खान अयुब खान (वय 22) अशी आहेत. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, आणि पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी हल्लेखोरांनी हत्येनंतर अपघाताचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद केले आहे. तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा वापर केला जात आहे. अधिक माहिती येणे बाकी आहे, आणि पोलिस या प्रकरणातील सर्व पैलूंची तपासणी करत आहेत.