कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवणं भोवलं; अभिनेता सोहेल खान आणि अरबाज खानविरोधात गुन्हा दाखल केलाय.
मुंबईः अभिनेता सोहेल खान, अभिनेता अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं एकच खळबळ उडालीय. 25 डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत दाखल झाले होते. परंतु त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पायदळी तुडवून थेट घर गाठल्यानं त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. अखेर त्या तक्रारीवरूनच पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
25 डिसेंबरला यूएईवरून हे तिघे मुंबईत परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी ताज लँडमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. परंतु त्यांनी 26 तारखेला या रुम रद्द करून त्यांनी थेट घर गाठले, त्यामुळे पालिकेने साथ नियंत्रण प्रतिबंधक कायद्यात अंतर्गत पोलिसात तक्रार केली. त्या तक्रारीवरूनच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नियमांचा भंग केल्यानंतर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्यवस्था न करता भायखळ्याच्या रिचर्डसन अँड क्रुझासमध्ये या तिघांना ठेवलं जाणार आहे. पोलिसांकडून या तिघांना रात्री ताब्यात घेतलं जाऊ शकतं. तसेच येत्या 9 तारखेपर्यंत त्यांना तिथे ठेवण्यात येणार असून, कोरोनाच्या नव्या अवताराची भीती असताना बड्या बॉलिवूड कलाकारांकडून मोठा हलगर्जीपणा होत असल्याचं समोर येत आहे.
बॉलिवूड कलाकार सोहेल खान, अरबाज खानविरोधात एफआयआर दाखल
बॉलिवूड कलाकार सोहेल खान, अरबाज खान आणि निर्वाण खान यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून एफआयआर दाखल करण्यात आलाय. एअरपोर्टवरून नियमांचा भंग करून पळून गेल्याप्रकरणी खार पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला गेलाय. नियमानुसार यूएईवरून आल्यानंतर त्यांना 7 दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे आवश्यक होते. 25 तारखेला हे तिघे जण यूएईहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. आपली बुकिंग ताज लॅन्ड्समध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ते तिघे परस्पर घरी गेल्याचं उघडकीस आलंय. खार पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांना पुन्हा एकदा क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवलं जाणार आहे.