अबब! एका एपिसोडसाठी अडीच लाख रुपये मानधन?
मुंबई : प्रेक्षकांचं मनोरंजन आणि प्रबोधनाचं काम करत असलेल्या विविध प्रकारच्या शो मधील अनेक कलाकार आता चित्रपटांमध्येही दिसू लागले आहेत. टीव्हीवर येणारी ‘क्राईम पेट्रोल’ ही मालिका सर्वांच्याच परिचयाची आहे. या मालिकेत अभिनय करणाऱ्या गीतांजली मिश्रा एका एपिसोडसाठी २ ते २.५ लाख रूपये इतकं मानधन घेते.
आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे काही कलाकारही या शोमध्ये आहेत. सन २०१० पासून गीतांजली मिश्रा ही ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमाशी जोडली गेलेली आहे. तिनं यामध्ये निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत.
प्रेक्षकांना तिच्या निगेटिव्ह भूमिका कायमच पसंतीस पडताना दिसतात. ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेमुळेच गीतांजली ही प्रामुख्यानं प्रकाशझोतात आली. तिचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत.
गीतांजलीनं क्राईम पेट्रोल व्यतिरिक्त मायके से बंधी डोर, रणबीर बानो, सोहनी महिवाल, मिट्टी की बन्नो, जय वैष्णो देवी, बालिका वधू अशा अनेक मालिकांमध्ये अभिनय साकारला आहे.