अपंग पतीने वाचविले पत्नीचे प्राण
भगवान गड लमाण तांडा येथिल छ्बुबाई एकनाथ राठोड वय ४५ वर्ष यांंच्या
वर शेतात काम करत असताना बिबट्या ने हल्ला केल्याने त्या गंभिर पणे जखमी झाल्या आहेत.
त्यांचे अपंग पती एकनाथ दासू राठोड हे त्याच्यां बरोबर होते पत्नी वर बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी दगड उचलत प्रतीकार केला तरी बिबट्याने त्यांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर एक पंजा मारला आहे त्यामुळे त्या जखमी झाल्या माहीती मिळताच युवकानी त्यांना खरवंडी कासार येथिल दिपक हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.
घटनेची माहीती मिळताच
वनविभागाचे कर्मचारी पिजंरा घेऊन निघाले आहेत.