अनलॉक ५ साठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स

1076

अनलॉक ५ साठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी

?? राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे.

?? येत्या ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत.

?? सोशल डिस्टंन्सिग पाळणं तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापरणे बंधनकारक आहे.

काय सुरू होणार?

??५ ऑक्टोबरपासून हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय

?? राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु

?? अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग सुरु करण्यास परवानगी

??ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर निर्बंध नाही

????मुंबईच्या डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी

?? पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय

??मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवण्यास परवानगी

काय बंद राहील?

??सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

??शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद

??मेट्रो वाहतूकदेखील ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार नाही

??सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here