पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांची नागपूर येथे मनरेगा आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
एक वर्षापुर्वी त्यांची पुणे महापालिकेच्या विशेष अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. त्यांनी झोपडपट्टी पूनर्वसन प्रकल्पांना गती दिली.
जलपर्णी घोटाळ्याची चौकशी, आंबिल ओढा सुधारणा, सीमाभिंत बांधणीला गती देणे. शहरातील घनकचरा व्यवस्थापन आणि मलनिस्सारण व्यवस्थापनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती.