अंतर्गत जिल्ह्यातील व्यवहार सोमवारपासून सुरु करण्याबाबत आदेश जारी. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश.

768

#कोविड19 सुसंगत वर्तणुकीचे पालन नागरिकांना बंधनकारक.

सोमवार दि.07 जून 2021 पासून पुढील आदेश होईपावेतो कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरचे पालन करणेचे अटीवर खालील प्रमाणे

निबंध शिथील करणेबाबत आदेशित करीत आहे.

  1. अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने/आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील.
  2. बिगर अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने/आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील. 3. मॉल, चित्रपटगृहे (मल्टीपेक्स तसेच सिंगल स्क्रिन), नाटयगृहे 50% क्षमतेने नियमित वेळेत कार्यरत
  3. रेस्टॉरंट नियमित वेळेत कार्यरत राहतील.
  4. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क याठिकाणी वावर करण्यास निबंध असणार नाहीत. 6. खाजगी कार्यालये त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील.
  5. सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालये 100% उपस्थितीसह कार्यरत राहतील.
  6. सर्व क्रिडाविषयक क्रियाकल्प चालू ठेवणेस परवानगी असेल.
  7. सर्व प्रकारच्या चित्रीकरणांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
  8. बंदीस्त सभागृहामध्ये लग्न समारंभाचे आयोजनास एकुण आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा 100 व्यक्ती या पैकी जे कमी असेल तितक्या व्यक्तीच्या उपस्थितीस परवानगी राहील. तसेच खुल्या जागेतील लग्न

समारंभाचे आयोजनास जास्तीत जास्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील. 11. अंत्यविधीस 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील.

  1. स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनास/ निवडणूकांस निर्बंध असणार

नाहीत.

  1. सर्व प्रकारचे बांधकाम क्रियाकल्प चालू राहतील.
  2. कृषीविषयक सर्व क्रियाकल्प चालू राहतील.
  3. वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार चालू राहतील.
  4. व्यायामशाळा, सलुन, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमित वेळेत चालू राहतील.
  5. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठल्याही निर्बंधाविना चालू राहिल. 18. सर्व प्रकारची कार्गों वाहतूक (चालकासह जास्तीत जास्त 3 व्यक्तींसह) चालू राहील.
  6. खाजगी कार/टॅक्सी/बस/दिर्घ पल्ल्याच्या रेल्वे याद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस मुभा असेल, तथापि, निबंधस्तर 5 मधील क्षेत्रातून सूटणा-या किंवा अशा क्षेत्रात थांबा असणा-या वाहतूकीदरम्यान सर्व प्रवाशांकडे ई-पास असणे बंधनकारक असेल.
  7. सर्व प्रकारची औदयोगिक केंद्रे त्यांच्या नियमित वेळेत चालू राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here