प्रसिद्ध गायक, संगीतकार बप्पी लहरी यांचं निधन
प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ६९ वर्षांचे होते. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
बप्पी लहरी यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “बप्पी लहरी मागील महिनाभरापासून रुग्णालयात उपचार घेत होते.
यानंतर त्यांना सोमवारी (१४ फेब्रुवारी) घरी सोडण्यात आलं. मात्र, मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली.
यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी घरीच डॉक्टर बोलावून तपासणी केली. यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”बप्पी लहरी यांना प्रकृतीविषयक अनेक त्रास सुरू होते.
त्यांचा मृत्यू ओएसए म्हणजेच ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अॅप्नियामुळे मध्यरात्रीच्या सुमारास झाला, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक नामजोशी यांनी दिली.
मागील वर्षी बप्पी लहरी यांना करोना संसर्गदरम्यान, बप्पी लहरी यांना एप्रिल २०२१ मध्ये करोना संसर्गही झाला होता.
त्यावेळी त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर ते काही दिवसांमध्येच बरे झाले.









