आयपीएल सामन्यात सट्टा लावताना एकास पकडले ; नगरात कापडबाजारात कारवाई

अहमदनगर – कोलकत्ता नाइट रायडर्स व मुंबई इंडियन्स या आयपीएल सामन्यात सट्टा लावताना एका आरोपीला रोख रकमेसह अहमदनगर शहरातील कापड बाजारात अटक करण्याची कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे. नदीम बाबासाहब शेख (वय २७, रा पारशाह खुंट डावरे गल्ली अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे यांच्या सूचनेनुसार पोना गणेश धोत्रे, पोना सलीम शेख, पोकॉ अतुल काजळे, पोकॉ दिपक रोहोकले, पोकॉ अभय कदम, पोना संतोष गोमसाळे, पोकॉ सोमनाथ राऊत आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, कोतवाली पोलिस ठाण्याचे पोनि संपतराव शिंदे हे पोलीस ठाण्यात रामनवमीनिमित्त बंदोबस्ताचे नियोजन करत असताना त्यांना माहिती मिळाली की, एकजण हा आयपीएल क्रिकेटकरीता मोबाईल फोनव्दारे हार-जित करणेकामी लोकांनकडून पैसे घेऊन त्याना त्यांचे व्हाटसप मोबाईल फोनवर आयडी व पासवर्ड देत आहे. सद्या राजलक्ष्मी स्टेशनर्स स्टोअरजवळ जुना कापडबाजाररोड लगत पिरशहा खुंट अहमदनगर येथे चहाच्या टपरी जवळ बसून हार-जितीचा जुगार खेळवितो आहे. आता गेल्यास मिळून येईल, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती. तातडीने कोतवालीचे पोनि. श्री शिंदे यांनी पथक तयार करून पथकाला संबंधित ठिकाणी खात्री करुन छापा टाका, अशी सूचना दिली होती. पथकाने छापा टाकला असता, एकजण राजलक्ष्मी स्टेशनर्स स्टोअरजवळ जुना कापडबाजाररोड लगत पिरशहा खुंट अ.नगर येथे चहाच्या टपरीजवळ बसून बातमीप्रमाणे मोबाईलमध्ये काहीतरी करताना दिसला, त्यास जागीच पकडून व मोबाईलची पाहणी केली. त्याच्या मोबाईलमध्ये व्हाटसपवर काही मोबाईल क्रं वरुन पैसे फोन पे ने पैसे घेतल्याचे तसेच त्यांना त्यांचे मोबाईल फोनवर पासवर्ड आकडे पाठवल्याचे INDIAN PREMIER LEAQUE ) KOLKATA KNIGHT RIDERS V MUMBAI INDIANS असे क्रिकेटचा स्कोअर व मार्केट ॲनालिसिस असे पा.फ्टवेअर चालू असल्याचे दिसल्याने त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नदीम बाबासाहब शेख (वय २७, रा पारशाह खुंट डावरे गल्ली अहमदनगर) असे असल्याचे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात खालीलप्रमाणे रोख रक्कम व व्हाटसपचा स्क्रिन टच मोबाईल फोन हा जुगाराचे साधन मिळून आला.१५ हजार ६५० रु एकूण प्रमाणे वरील वर्णनाचा विवो कंपनीचा मोबाईल फोन जुगाराचे साहित्य ( क्रिकेट चा स्कोअरवर ) व रोख रक्कम मोबाईल क्रं वरुन पैसे फोन पे ने पैसे घेतल्याचे तसेच त्यांना त्यांचे मोबाईल फोन वर पासवर्ड आकडे , पाठवल्याने दि.९ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी १०.१० वाजण्याच्या सुमारास अहमदनगर शहरातील राजलक्ष्मी स्टेशनर्स स्टोअरजवळ जुनाकापड बाजाररोड लगत पिरशहा खुंट अ.नगर येथे चहाच्या टपरीजवळ आडोशाला नदीम बाबासाहब शेख हा त्याच्या मोबाईल फोनवर लोकांना व्हाटसपवर पासवर्ड आकडे व साईटव्दारे लोकाना फोन-पेव्दारे पैसे व व्हाटसपवर आकडे पासवर्ड देऊन ( क्रिकेटचा स्कोअरवर) हार-जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना रक्कम व ॲन्डोईड स्किन टच मोबाईल फोन असे जुगाराचे साधनासह मिळून आला. कोतवाली पोलिसांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश धोत्रे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here