न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा साहेब यांच्या हस्ते 2022 वर्षाच्या डायरीचे प्रकाशन व वितरण
अहमदनगर – लॉयर्स सोसायटीची डायरी बाळगणे हा वकिलांसाठी स्टेट्स आहे. कमी नफा झालेला असतानाही लॉयर्स सोसायटीचा आपल्या सदस्यांना डायरी देण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे. आता करोनाचा काळ व संकट संपत आले आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयात उत्साहाचे वातावरण आहे. दिवाळीच्या सुटी नंतर नव्या सर्वांनी जोमाने काम करावे, असे आवाहन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी केले. जिल्हा न्यायालयात अहमदनगर लॉयर्स को-ऑप सोसायटीच्या 2022 वर्षाच्या डायरीचे प्रकाशन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सोसायटीचे चेअरमन ॲड. नानासाहेब पादीर, व्हाईस चेअरमन प्रभाकर शहाणे, वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बर्हाटे, सोसायटीचे सचिव ॲड. रफिक बेग, केंद्र सरकारचे वकिल सुभाष भोर, ॲड. अनिल सरोदे, संचालक ॲड. सुधीर टोकेकर,ॲड. बाळासाहेब गोफणे, ॲड. सुरेश कोहकडे, ॲड. रविंद्र शितोळे, ॲड. अरविंद मुळे,ॲड. स्वाती नगरकर,ॲड. सविता कराळे, ॲड. सुरेश ठोकळ, ॲड. चंद्रकांत शेकडे, ॲड. मंगेश सोले, ॲड. शिवाजीराव अनभुले, ॲड. बी. एस. खांडरे आदी उपस्थित होते. प्रास्तविकात चेअरमन नानासाहेब पादीर म्हणाले, लॉयर्स सोसायटी सभासदांची हित पाहणारी सोसायटी आहे. यावर्षी न्यायालयाच्या कामकाज पूर्ण क्षमतेने झालेले नसल्याने स्टॅम्प विक्रीतून सोसायटीला मिळणारे उत्पन्नात मोठ्याप्रमाणात घट झाली आहे. तरीही काटकसर करून लाभांष स्वरुपात सर्व वकिल सभासदांना वर्षभर उपयोगी पडेल अशी सुटसुटीत, आकर्षक व विविध रंगातील 2022 वर्षाची डायरी देत आहोत. वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बर्हाटे यांनी यावेळी लॉयर्स सोसायटीच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड. सुधीर टोकेकर यांनी केले तर आभार सचिव ऍड. रफिक बेग यांनी मानले. न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते सदस्यांना डायरींचे वाटप करण्यात आले. यावेळी सोसायटीच्या व्यवस्थापक अश्विनी पवार, एस. एल. दंडवते, एस. ए. घोलप, ए. ए. मुळे आदी कर्मचारी उपस्थित होते.