गॅस सिलेंडरच्या स्फोटने राहत्या छपराला आग लागून संसार उद्धवस्त;

आष्टी (अण्णासाहेब साबळे)-आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील शेतकरी बाप्पु महंमद शेख यांचे घर सोमवारी रात्री ११च्या सुमारास सीलेंडच्या स्पोटने जळून खाक झाले.

यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तुंचा कोळसा झाला आहे.व आठ शेळया जळुन खाक झाल्या व तीन‌ जखमी अवस्थेत आहेत.यावेळी कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने जीवितहानी झाली नाही.

मात्र बाप्पु शेख यांची मुलगी बालम बाप्पु शेख हिला तोंडावर आही लागली आहे.बाप्पु शेख यांच्या घरातील सर्वच साहित्याचा कोळसा झाला.यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले.बापू महंमद शेख यांना शासनाच्यावतीने मदत घर देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

त्यांच्या छपरा लागतच रंगनाथ गाडे यांच्याही छपराला आग लागली त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे.सोमवारी रात्री बापू शेख यांची पत्नी व मुलगी,संध्याकाळी जेवण करून छपरा मध्ये झोपल्या होत्या,त्यांनी घरामध्ये .

गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व आग लागली व मोठा जाळ झाला,अचानक मोठा जाळ झाल्याने,बालम व तिची आई घाबरून बाहेर पळाल्या.त्यामुळे त्यांना घरातल्या जीवनावश्यक वस्तू कोणत्याच बाहेर काढता आल्या नाहीत.व त्या घरांमध्ये त्यांच्या लहान-मोठ्या अशा दहा-बारा शेळ्या होत्या.त्यांना सुद्धा सोडून बाहेर काढता आले नाही.

त्यातील आठ शेळ्या जळून खाक झाल्या व तीन जखमी अवस्थेत आहेत.त्याचे पाचपोते धान्य,देखील जळून खाक झाले.अशा दुर्दैवी घटनेमुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.

घरामध्ये गॅस सिलिंडर असल्यामुळे कोणीच घरात प्रवेश केला नाही.आगीत घरातील गॅस सिलिंडर,शेती उपयोगी साहित्य, कपडे,धान्य,स्वयंपाकाचे भांडे, २लाख रुपये रोख रक्कम,आदी साहित्याचा कोळसा झाला.

आग विझविण्यासाठी घरी पाणी उपलब्ध नसल्यामुळे वाहिरा येथील सबस्टेशन वरती रवी आटोळे,यांना फोन करून थ्री फेज लाईट सोडवण्यास सांगितली व बापू शेख,त्यांच्या विहिरीवरून मोटरपंप सुरू करून आग विझविण्यात आली. यावेळी.देविदास मेटे,यांनी झटपट आग विझवली.बापू शेख,यांच्या राहत्या छपराला आग लागली असे कळताच गावातील,सत्तार शेख उमेश पगारे महादेव झांजे भाऊसाहेब झांजे जमीर शेख नसीर शेख पांडू घोडके संभाजी गाडी काशिनाथ चौधरी रवी वेटे भावेश पगारे रवी गाडे नवनाथ गाडे बाबासाहेब पगारे वसंत झांजे शाहरुख शेख या सर्वांनी जाऊन आग विझवण्यात खूप मदत केली.

घरातून सगळे आग लागल्यामुळे बाहेर पळाले त्यामुळे जीवितहानी टळली.मात्र शेळ्या जळून खाक झाल्या आहेत.बापू शेख,व त्यांची पत्नी,बालम शेख,हे मोल मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करतात.आहेत

आगीत सर्वच भस्मसात झाल्यामुळे अंगावरील कपड्याशिवाय त्यांचे जवळ काहीच शिल्लक नाही.यावेळी तलाठी व पशुसंवर्धन अधिकारी,यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here