लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर तीन वर्षे बलात्कार
नाशिक (प्रतिनिधी): तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षे बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
तरुणीला लग्नाचे आमिष देत तीन वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या तरुणाच्या विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश कांतिलाल कामडी (रा. पेठ) असे या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित तरुणीनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयिताने लग्नाचे अमिष देत प्रेमसंबध प्रस्थापित केले. तीन वर्षांपासून संशयिताने आमिष देत शरीरसंबंध ठेवत अत्याचार केले. लग्न करण्याचे विचारले असता संशयिताने शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. वरिष्ठ निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.









