महाबळेश्वर (सातारा) : सध्या देशभरात वाराणसीतील ज्ञानवापी मशीद व मंदिर याबाबत वादविवाद सुरू असल्याने त्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं प्रतापगडावर (Pratapgad) शीघ्र कृती दलाच्या तुकडीनं अफजलखानाच्या कबर (Afzal Khan) परिसरात बंदोबस्त ठेवलाय
.शीघ्र कृती दलाचे नवी मुंबईचे असिस्टंट कमांडंट स्वप्निल पाटील यांच्यासह ५० जवान व क्युआरटीचे १५ जवान असे महाबळेश्वर पोलीस ठाण्यात (Mahabaleshwar Police Station) दाखल झाले आहेत.
त्यांच्यासह पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली.
बैठकीस स्वप्निल पाटील व पोलिस उपअधीक्षक शीतल जानवे – खराडे, पोलिस निरीक्षक देवकर , पोलिस निरीक्षक भरणे व शहरातील शांतता समितीचे सदस्य रोहित ढेबे, सलिम बागवान, नगरसेवक अफजल सुतार, युसुफ शेख, प्रकाश पाटील, महेश गुजर, अशोक शिंदे व नागरिक उपस्थित होते.
बैठकीत ज्ञानवापी मशीद व मंदिर या अनुषंगानं जातीय तणाव निर्माण होणार नाही व संभाव्य मशीद, मंदिर वाद या विषयावर चर्चा केली.