विशाल सुर्वे खुन प्रकरणाला वेगळे वळण: मुख्य आरोपी माजी उपसरपंच संजय सुर्वेला अटक करा- मयताचे भाऊ व वडीला सह नातेवाईकांची मागणी .

खर्डाचा विशाल सुर्वे खुन प्रकरणाला वेगळे वळण: मुख्य आरोपी माजी उपसरपंच संजय सुर्वेला अटक करा- मयताचे भाऊ व वडीला सह नातेवाईकांची मागणी मयताचे नातेवाईक पोलीस अधीक्षक यांना लवकरच भेटणार

जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विशाल सुर्वे वय (३२) खून प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून मुख्य आरोपी खर्डा ग्रामपंचायतचा माजी उपसरपंच संजय सुर्वे असल्याचा आरोप मयताचे वडील व भाऊ यांनी केला असून अटक करण्याची नातेवाईकांनी मागणी केली आहे.

अटक केली नाही तर आम्ही आमरण उपोषण आंदोलन करणार असा प्रसार माध्यमाशी बोलताना इशारा दिला. जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विशाल सुर्वे याचा दि १४ मे रोजी अनैतिक संबंधातुन खुन झाला होता.

नियोजनबद्ध कट रचुन खुन केल्याचे स्पष्ट करत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या पथकाने २४तासांत मयताची पत्नी तसेच कृष्णा संजय सुर्वे व श्रीधर राम कन्हेरकर या तिघांना अटक केली.

मात्र मुख्य आरोपी संजय सुर्वे असल्याचा आरोप मयताचे वडील ईश्वर सुर्वे भाऊ सुशेन यांनी माध्यमाशी बोलताना केला आहे.

त्याला अटक करण्याची मागणी केली आहे.मयताचा भाऊ सुशेन सुर्वे यांनी सांगितले की मुख्य आरोपी संजय सुर्वे खुन झाल्यावर आमच्या घरी आला होता. “माझे नाव कूठे आले नाही पाहिजे.

मी जाईन एखाद्याला घेऊन जाईन अशी धमकी दिली” .आम्हाला धोका आहे त्याला अटक करावी.संजय सुर्वे खर्डाचा त्याच्या राहत्या घरून घराला कुलूप लावून परिवार सह पळुन गेला असा आरोप मयताचे नातेवाईक यांनी आरोप केला आहे.

मुख्य आरोपीला अटक न केल्यास आम्ही आंदोलन उपोषण करणार असल्याचे मयताचे वडील ईश्वर सुर्वे भाऊ चूलते यांनी सांगितले.

आता पोलिसांच्या भुमिकेकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here