कर्जत पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपींचा जामीन अर्ज श्रीगोंदा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने नुकताच नामंजूर केला आहे कोंभळी येथील एका महिलेने आपल्या मुलीच्या वाढदिवसादिवशी व नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या घरावरती असणारे अॅगलच्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या आरोपीने बाहेरगावच्या लोकांना बोलावून महिलेच्या पतीस लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने मारहाण केली होती व महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला होता.
याबाबत कर्जत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार होते त्यांनी २० मे रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता त्यांनी दाखल केलेल्या अर्जात महिलेच्या वतीने ॲड राहुल एल मते यांनी वकील पत्र दाखल करत आरोपींनी केलेला गुन्हा व त्याची पार्श्वभूमी कोर्टासमोर मांडली व त्यांच्या वरती असलेल्या या पूर्वीच्या गुन्ह्याची माहिती मिळवून कोर्टासमोर आणली आरोपींच्या वकिलांचा व मूळ फिर्यादी(महिलेच्या)यांचे वकिलांचा 04 जुन रोजीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 10 जुन रोजी आपला निर्णय घोषित करत मुख्य आरोपींना जामीन अर्ज फेटाळला.
मूळ फिर्यादीचे वतीने ॲड राहुल एल मते यांनी काम पाहिले तर त्यांना सरकारी वकील ॲड घोडके ॲड अनिकेत वनवे ॲड देवा थोरवे ॲड किशोर भिसे यांनी सहकार्य केले.