विद्युत सहाय्यकास झालेल्या मारहाण प्रकरणी निर्दोष मुक्तता .

अहमदनगर:

शेवगाव तालुक्यातील देवटाकळी येथे म.रा.वि.वि मंडळ भातकुडगाव येथील विद्युत सहाय्यकास दि. २०/१०/२०१६ रोजी झालेल्या मारहाण प्रकरणी गुन्हा रजि. नं. ३०७/२०१६ रोजी शेवगाव पो.स्टे येथे भा‌ं.द.वि कलम ३५३,३२३,५०४,५०६ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

तपासाअ‌ंती पोलीसांनी आरोपी शब्बीर अकबर शेख रा. देवटाकळी याचे विरुद्ध दोषारोपत्र अहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते .

या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब ५ माननीय न्यायाधीश साहेब यांच्यासमोर झाली. सरकारी पक्षातर्फे एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायनिर्णय खुल्या न्यायालयात जाहीर करण्यात आला यामध्ये दि.४/०५/२०२२ रोजी आरोपी नामे शब्बीर अकबर शेख ची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामध्ये आरोपीतर्फे अ‍ॅड.युनूस सिकंदर शेख यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here