नगर : भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे करणार्या नीलेश सुनील पेंडूलकर (वय 25, रा. पाटील गल्ली, भिंगार) याच्याविरूध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड (एमपीडीए) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मंजुरी दिली आहे.
आरोपी पेंडूलकरला भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत नाशिकच्या कारागृहात एक वर्षांसाठी स्थानबद्ध केले असल्याची माहिती सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.
नीलेश पेंडूलकर हा भिंगार कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे करत होता. त्याच्याविरूध्द मारहाणीचे चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरूध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने सहायक निरीक्षक देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता.
चार महिन्यापूर्वी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी मंजुरी दिली.