मुंबई: प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली आहे.
येस बँकेच्या 3 हजार 700 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आणि ईडीकडून तपास केला जात आहे. डीएचएफएल या फायनान्स कंपनीने येस बँकेकडून 3000 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ही कंपनी नंतर दिवाळखोरीत दाखवून हे कर्ज बुडवण्यात आलं होतं. या कर्जाचा मोठी हिस्सा हा रेडियस ग्रुपला देण्यात आला होता. येस बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी हे कनेक्शन उघड झालं असून सीबीआयने ही कारवाई केली आहे.













