पोलीस निरीक्षक कीर्तनस्थळी बूट घालून, चाळीसगावमध्ये कार्यक्रम केला बंद, वारकरी संतप्तचाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माइव व स्पीकर लावून कीर्तन सुरू होते. तेव्हा शहर पोलीस (Police) निरीक्षक के. के. पाटील यांनी यांनी हे कीर्तन बंद पाडले. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले.जळगावः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पाडव्यादिवशी शिवतीर्थावर घेतलेल्या सभेनंतर राज्यभर भोंग्यावरून राजकीय वादंग निर्माण झाले आहे. औरंगाबादमध्ये ऐन अजानाच्यावेळी गाणे वाजवले म्हणून पहिली तक्रार नोंदवली गेली. तर जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगावमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने बंद पाडलेल्या कीर्तनावरून वाद निर्माण झालाय. चाळीसगावमधील हनुमानसिंग राजपूत नगर येथील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माइव व स्पीकर लावून कीर्तन सुरू होते. तेव्हा शहर पोलीस (Police) निरीक्षक के. के. पाटील यांनी यांनी हे कीर्तन बंद पाडले. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले.
यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये नाराजी आहे. वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.नेमके प्रकरण काय?चाळीसगावमधल्या सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माइक व स्पीकर लाऊन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता.
यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू असलेले कीर्तन बंद केले. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विषय असेलल्या नारदांच्या गादीवर ते बूट घालून वर चढले. तसेच वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षकांचा तसा एक फोटोही व्हायरल झाला आहे.