आपल्या पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागून त्याच्यासोबत भांडून काही उपयोग नाही हे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या पत्नीने पतीची प्रेयसी असलेल्या महिलेच्या साडेतीन वर्षाच्या मुलाला नदीत बुडून त्याचा खून केला होता.
तीन वर्षांपूर्वीची ही घटना असून त्यानंतर बीड जिल्हा आणि सत्र न्यायाधीश असलेले हेमंत महाजन यांनी महिलेला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.शारदा श्रीराम शिंदे ( राहणार बीड शहर ) असे आरोपी महिलेचे नाव असून तिचा पती असलेला श्रीराम हा एका कारखान्यावर काम करत होता.
याच दरम्यान त्याचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. श्रीराम हा स्वभावाने भोळा होता त्यामुळे सदर महिला मागेल तशी आर्थिक मदत तो तिला करत असायचा यातून पती-पत्नीत वाद निर्माण होऊ लागले.
सदर प्रकाराची शारदा ह्याला माहिती समजल्यानंतर तिने देखील त्या महिलेला फोन करून अनेकदा तिच्यासोबत भांडण केले मात्र ती ‘ तुला तुझा नवरा सांभाळता येत नाही मला कशाला फोन करतेस ‘ असे सांगत उलटून बोलत असायची.
काही काळ गेल्यानंतर पतीच्या वागण्यात आणि त्याच्या प्रेयसीच्या वागण्यात काहीच सुधारणा होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शारदा हिने पतीच्या अनैतिक संबंधाचा राग धरून त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचली आणि तिचा साडेतीन वर्षाचा मुलगा याला झोपेतून उचलले आणि नदीमध्ये बुडवून त्याचा खून केला त्यानंतर या मुलाच्या आईने पोलिसात फिर्याद दिली होती आणि शारदा शिंदे हिच्याविरोधात शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.
सदर प्रकरणी सुनावणी झाल्यानंतर तिला दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे