नगरची ‘ ताबा ‘ गुन्हेगारी देतेय न्यायव्यवस्थेला अन पोलिसांना आव्हान

नगरी गुन्हेगारीचा ‘ ताबा ‘ पॅटर्न , ना पोलीस ना मनपा रात्रीतून गाळे पुन्हा एकदा भुईसपाटनगर शहरासह परिसरात असलेले गुंड यांच्या मदतीने त्याच्या प्लॉटला कंपाऊंड मारून अचानकपणे तिथे टपऱ्या टाकत प्लॉटचा ताबा घेतला जातो याला नगरी भाषेत ‘ ताबा बसवणे ‘ असे म्हणतात. सदर प्रकरणात अनेक गुंडांचा आणि टोळक्यांचा समावेश असून हतबल झालेला जागा मालक सुरुवातीला पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावतो आणि पोलीस प्रशासनाकडून सदर प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आहे असे सांगून हात वर करण्यात येतात.हतबल जागामालक हा सुरूवातीला पोलीस त्यानंतर महापालिका यांच्याकडे पोहोचल्यानंतर महापालिकेचे कार्यक्षम ( ?) अधिकारी ताबा कोणी बसवला आहे याची माहिती घेऊन त्या अनुषंगाने तक्रारदाराची बोळवण करतात मात्र त्यामुळे तक्रारदाराला न्याय मिळतच नाही आणि अखेर तो न्यायालयात पोहोचतो. न्यायालयात पोचल्यानंतर ‘ तारीख पे तारीख ‘ या न्यायाने न्याय मिळेपर्यंत हतबल झालेला जागा मालक काही प्रसंगात आपला प्लॉट या गुंडांच्या घशात घालतो.सर्वच जागा मालक हे काही श्रीमंत नसतात. काहीजण एक एक रुपया जमवून आपले आयुष्याचे घराचे स्वप्न पूर्ण करायचे या आशेने एखादा प्लॉट विकत घेतात मात्र बांधकाम करण्यासाठी आर्थिक तजवीज न झाल्याने याचा फायदा घेत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून असे प्रकार नगर शहर आणि उपनगर परिसरात घडत आहेत. पोलिस प्रशासन आणि महापालिका यांच्या समन्वयाने सदर प्रकरणे कोर्टापर्यंत जाण्यापासून रोखता येतील मात्र त्यासाठी आवश्यक ती इच्छाशक्ती पोलीस प्रशासन आणि महापालिका अधिकारी यांच्यात दिसून येत नाहीनगर शहरात एक खळबळजनक घटना उघडकीला आली असून मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात असतानादेखील जागा खरेदी केलेल्या मालकाने बळजबरीने रात्रीच्या वेळी जेसीबी आणून गाळे उद्ध्वस्त करून टाकले आणि त्यामध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे सामान देखील गायब झाले असल्याचे भाडेकरूंचे म्हणणे आहे. नगर शहरातील आझाद चौक परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीला आलेली आहे.उपलब्ध माहितीनुसार, मयुर दिलीप कुलथे आणि आरती मयूर कुलथे ( राहणार राजयोग बंगला सावेडी ) अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे असून त्यांच्याविरोधात राहुल पुरूषोत्तम गारदे ( राहणार सबजेल चौक ) यांनी फिर्याद दिली आहे. नगर शहरातील मध्यवर्ती असलेल्या आजाद चौक येथे देशमुख वाडा येथील तीन गाळे ६५ वर्षांपूर्वी गारदे यांच्यासह कैलास श्रावण निकम आणि महेश ज्ञानेश्वर थोरात यांनी भाडेतत्त्वावर घेतले होते मात्र त्यानंतर मयूर कुलथे याने मूळ जागा मालकाकडून विकत घेतली.गाळे विकत घेतल्यानंतर मयूर कुलथे याने गाळ्यात भाडेकरू म्हणून असलेल्या तिन्ही जणांना दमदाटी सुरू केली आणि गाळे खाली करा नाहीतर रात्रीतून जेसीबी आणून सोडून टाकील अशी देखील धमकी दिली असल्याचे फिर्यादीचे म्हणणे आहे त्यानंतर गाळेधारक यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आणि पुढे प्रकरण न्यायालयात पोहोचले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मयूर दिलीप कुलथे याने रात्रीतून जेसीबी आणून गाळे काढून टाकले असे फिर्यादीचे म्हणणे आहे.गुरुवारी रात्री गाळेधारक साडेनऊच्या सुमारास दुकान बंद करून निघून गेले होते त्यानंतर भाडेकरू असलेले महेश ज्ञानेश्वर थोरात हे सकाळी शुक्रवारी सकाळी गाळा उघडण्यासाठी आलेले असताना तीनही गाळे पाडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.. त्यांनी ही माहिती इतर दोन भाडेकरूंना देखील दिली आणि त्यानंतर दुकानातील साहित्याची पाहणी केली असता बहुतांश साहित्य गायब झाले होते. इतर दोन जणांच्या गाळ्यातील मोबाईल आणि इतर साहित्य मिळून सुमारे दोन लाख 97 हजार रुपयांचा माल मयूर कुलथे यांना चोरलेला आहे असाही गाळा धारक असलेल्या व्यक्तींनी आरोप केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here