जीवन प्राधिकरण’मधून रोकड लंपासनगर

जीवन प्राधिकरण’मधून रोकड लंपासनगर

शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयातून ४० हजार रुपयांची रोकड अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली.

याबाबत सतिश साहेबराव बडे (रा.संभाजीनगर, पाथर्डी रोड, वडारवाडी, भिंगार) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हातचलाखीने चोरी

फिर्यादी बडे हे तारकपूर परिसरात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यालयात नोकरीस आहेत. त्यांनी त्यांच्या टेबलच्या ड्राॅवरमध्ये ४० हजार रुपयांची रोकड ठेवलेली होती.

अज्ञाताने हातचलाखी करत सदरची रक्कम चोरुन नेली.  याबाबत बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here