ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी दाखल खटल्यात राष्ट्रवादीच्या आमदाराची निर्दोष मुक्तता!
नगर – पारनेरचे आमदार निलेश लंके यांची जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निर्दोष मुक्तता केलीय.मतदारांच्या याद्या मुदतीच्या आत तहसील कार्यालयात सादर केल्या नसल्याच्या रागातून ही मारहाण झाली होती.
मात्र या खटल्यात न्यायालयानं जे साक्षीदार तपासले, त्यामध्ये एकवाक्यता नव्हती. विशेष म्हणजे ग्रामसेवकाविरुध्द ग्रामस्थांची पंचायत समितीकडे दप्तर दिरंगाईप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.
न्यायायालयाने सर्व पुरावे आणि साक्षीवरुन आमदार निलेश लंके आणि त्यांच्या सहकार्यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात अॅड. सतीश गुगळे आणि युवराज पाटील यांनी काम पाहिलं.