कॉमेडियन भारती सिंगविरुद्ध (Bharti Singh) आयपीसी कलम २९५-ए अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एफआयआर एसजीपीसीने नोंदवला आहे. भारती हिने मिशा आणि दाढीवरून विनोद केल्यानंतर शीख समुदाय संतप्त झाला होता. भारती हिने दाढी मिशांबाबत केलेल्या टिप्पणीला प्रचंड विरोध झाला होता. यानंतर तिने हात जोडून माफी मागितली होती. तरीही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीने शोमध्ये दाढी आणि मिशांवर विनोद केला होता. यावर शीख समाजाचे लोक आक्षेप घेत होते. भारतीला ट्रोलही केले जात होते. याप्रकरणी अमृतसरच्या शीख संघटनांनी भारती सिंहविरोधात निदर्शने केली होती.
प्रकरण वाढल्यानंतर भारतीने शीख समुदायाची हात जोडून माफीही मागितली होती. SGPC एफआयआर नोंदवणार असल्याची बातमी होती. भारती सिंह यांच्या वक्तव्यावर शीख समुदायाचे लोक प्रचंड संतापले आहेत.
भारती हिने दाढी मिशांबाबत केलेल्या टिप्पणीला प्रचंड विरोध झाला होता. यानंतर तिने हात जोडून माफी मागितली होती. तरीही तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Filed a case against Bharti Singh)भारतीने शोमध्ये दाढी आणि मिशांवर विनोद केला होता. यावर शीख समाजाचे लोक आक्षेप घेत होते. भारतीला ट्रोलही केले जात होते.
याप्रकरणी अमृतसरच्या शीख संघटनांनी भारती सिंहविरोधात निदर्शने केली होती. प्रकरण वाढल्यानंतर भारतीने शीख समुदायाची हात जोडून माफीही मागितली होती. SGPC एफआयआर नोंदवणार असल्याची बातमी होती.
भारती सिंह यांच्या वक्तव्यावर शीख समुदायाचे लोक प्रचंड संतापले आहेत.हेही वाचा: सीमांकनावरून मुस्लिम देशांची संघटना OIC भडकली; भारताने फटकारलेटीव्ही अभिनेत्री जस्मिन भसीन भारतीच्या (Bharti Singh) कॉमेडी शोमध्ये पाहुणे म्हणून आली होती. जस्मिनसोबत मस्ती करताना भारतीने दाढी-मिशी का ठेवू नये असे म्हटले होते.
दूध प्यायल्यावर दाढी तोंडात घातली तर शेवया टेस्ट येतात. माझे अनेक मित्र ज्यांचे नुकतेच लग्न झाले आहे, ते दिवसभर दाढी-मिशीतील उवा काढण्यात घालवतात. दाढी-मिशींबाबत भारतीच्या या कमेंटवरून वाद निर्माण झाला आहे.भारतीने मागितली होती माफीमी कोणत्याही विशिष्ट धर्माचा किंवा जातीचा उल्लेख करून दाढी-मिश्या ठेवतात आणि मग असे प्रॉब्लेम होतात असे म्हटले नाही.
पंजाबी लोकांसाठी मी नाही म्हटले की ते दाढी ठेवतात. मी सहज बोलले होते. मी फक्त विनोद करत होती. माझ्या मेत्रिणीसोबत. दाढी-मिश्या तर आजकाल कुणीही ठेवते. परंतु, जर माझ्या बोलण्याने कुणा विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर मी हात जोडून माफी मागते. मी स्वतः एक पंजाबी आहे.
माझा जन्म अमृतसरचा आहे. मी पंजाबचा सन्मान करते आणि मला अभिमान आहे की मी पंजाबी आहे, असे भारती सिंह म्हणाली होती.