शेवगावमधील गंगामाई साखर कारखान्याला आग
नगर ः शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्यातील बॅक टरबाइनला काल सायंकाळी आग लागली. ही आग वेगाने पसरत कारखान्यातील बेल्ट आणि त्यानंतर भुसा डेपाेपर्यंत गेली.
कारखान्यातून धुराचे लाेट येत हाेते. अग्निशमन दलाने पाणी फवारून ही आग काल रात्री उशिरा आटाेक्यात आणली.