वृद्ध व्यक्तीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या:
नगर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीला आलेली असून मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका व्यक्तीने इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
शनिवारी तीस तारखेला जुने महापालिका कार्यालय परिसरात ही घटना घडलेली असून गोवर्धन रामचंद्र जेटला ( वय 50 राहणार शिवाजीनगर अहमदनगर ) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
दिपाली राजू आडेप ( राहणार शिवाजीनगर ), सारिका विनोद भीमनाथ ( राहणार भावना ऋषी सोसायटी कल्याण रोड ), राजमणि बोडके, राजेश जंगम आणि सपना जंगम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मयत व्यक्तीचे पुत्र रोहन गोवर्धन जेटला यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे फिर्यादी यांची आई वैशाली जेटला यांचा एक वर्षांपूर्वी मृत्यू झालेला आहे.
गोवर्धन हे एकटे असल्याने त्यांनी सारिका भीमनाथ हिला लग्नासाठी स्थळ पाहण्यास सांगितले होते. सारिका हिने दिपाली आडेप हिचे स्थळ सुचवले आणि तिला घेऊन फिर्यादीच्या घरी आली.
सदर लग्नाला मुलगा रोहन याने विरोध केला होता मात्र त्याचे काहीही न ऐकता गोवर्धन यांनी दिपाली हिच्यासोबत वीस एप्रिल २०२२ रोजी लग्न केले. लग्नानंतर दिपाली आणि सारिका यांनी तुमच्या बँक खात्यातील दोन लाख रुपये द्या नाहीतर तुमच्या घरी जाऊन राहू अशी धमकी दिली त्यामुळे फिर्यादी यांनी दिपाली आणि सारिका यांना हे पैसे दिले.‘
तुम्ही हे पैसे बहीण अपूर्वा हिच्या लग्नासाठी तिच्या खात्यावर टाकणार होतात तसे तुम्ही लिहून दिले होते ‘ असे फिर्यादी वडिलांना म्हणाले त्यामुळे दिपाली हिच्याकडे पैसे घेण्यासाठी गेले असताना दीपालीने तुम्ही मला पैसे दिलेच नाहीत असे म्हणत वडिलांची वाद घातला.
हतबल झालेले गोवर्धन जेटला यांनी इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली असून सदर प्रकाराचा त्यांनी मृत्यूपूर्व व्हिडिओदेखील बनवलेला आहे आणि तशी चिठ्ठी देखील लिहिलेली आहे असे फिर्यादी यांनी म्हटलेले आहे.