विनयभंगाच्या गुन्ह्यात बाळ बोठे याचा नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला.

औरंगाबाद/अहमदनगर :कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात बाळ बोठे याचा नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी आज फेटाळला.

साविस्तर बातमी:

कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali police station) दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब बोठे (Bal Bothe) याचा नियमित जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी बुधवारी (दि. 27) नामंजूर केला आहे.

एका विवाहित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात 27 डिसेंबर, 2020 रोजी आरोपी बाळ बोठे विरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोठे याच्यावतीने नियमित जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.

जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील आणि फिर्यादीचे वकील सचिन पटेकर यांनी जामीन देण्यास विरोध दर्शविला. बोठे याच्यावर यापूर्वी दाखल असलेले विविध गुन्हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, असे म्हणणे सादर करण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून नियमित जामीन अर्ज नामंजूर केला आहे.

बोठेच्यावतीने औरंगाबाद खंडपीठ अपील करण्यात आले होते. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. नारायण नरवडे यांनी काम पाहिले. बाठे विरुद्ध दाखल असलेला रेखा जरे हत्याकांडातील महत्वाचे पुरावे तसेच मंगल भुजबळ यांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील महत्त्वाचे जाबाब न्यायालयासमोर सादर करण्यात आले होते.

या विवाहित महिलेला बाळ बोठे वारंवार फोन करीत असल्याचे सीडीआरच्या माध्यमातून निर्दशनास आणून देण्यात आले. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरून बोठेचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here