आरोपी पळताना पाहून न्यायालयाबाहेर तैनात असलेले वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) आणि बोरिवली पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत आरोपीला पकडून चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. या सिनेस्टाईल थराराची सध्या पोलीस दलासह सर्वत्र चर्चा आाहे.मुंबई : जीव धोक्यात घालून कोर्टातून फरार झालेल्या खतरनाक आरोपीला पोलिसांनी (Mumbai Police) पाठलाग करून अटक केली असल्याची घटना समोर आली आहे. बोरिवली पोलिसांनी डझनभर गुन्ह्यात आरोपी एका खतरनाक आरोपीला (Mumbai Crime) अटक केली होती, आज त्याला बोरिवली कोर्टात हजर करण्यात आले, हजर झाल्यानंतर चारकोप पोलीस त्याला ताब्यात घेणार होते, मात्र आरोपींना न्यायालयातून जेसी मिळताच पोलिसांना चकवा देऊन आरोपी न्यायालयातून फरार झाला. आरोपी पळताना पाहून न्यायालयाबाहेर तैनात असलेले वाहतूक पोलीस (Mumbai Traffic Police) आणि बोरिवली पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर धावत आरोपीला पकडून चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. या सिनेस्टाईल थराराची सध्या पोलीस दलासह सर्वत्र चर्चा आाहे. अशा खतरनाक स्टाईलने आरोपी पकडण्याचे प्रकार क्विचितच पहायला मिळतात.आरोपीवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखलपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असून त्याच्याविरुद्ध बोरीवली, चारकोप, कुरार, दहिसर, कांदिवली पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी, स्नैचिंग, लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पोलीस असल्याची नोंद आहे.या सर्व पोलीस ठाण्याचे तपास पथक आरोपीच्या शोधात होते. पोलिसांनी मोठ्या शोधानंतर या आरोपली पकडे आणि आज कोर्टात हजर केले. मात्र नंतर जे घडले त्याची अपेक्षा पोलिसांनीही कधीच केली नसेल. हा आरोप एवढ्या पोलीस बदबस्तातूनही पोलिसांच्या हातावर तुरू देऊन पुन्हा फरार व्हायच्या तयारीत होता.मुंबईच्या रस्त्यावर थरारजगातील सर्वात वेगवान आणि जबरदस्त पोलीस दल म्हणून मुंबई पोलिसांना त्यापैकी एक मानले जाते. या मुंबई पोलिसांच्या हातावर तरू देऊन फरार होण्याचा या आरोपीचा हा प्रयत्न पोलिसांनी मोठ्या मेहनतीने हाणून पाडला आहे. आणि या आरोपीला पुन्हा कोठडी मुक्कामी नेला आहे. यावेळी याला पकडतानाचा थरार यावेळी मुंबईतील सर्वसामान्य जनतेनेही अनुभवला. भर उन्हा या पोलिसांना याचा पाठलाग करताना पाहून काही वेळ लोकही अचंबित झाले होते. पण पोलिसांनी काहीही करून याला निसटू दिले नाही. त्यामुळे पोलिसांच्या हा मेहनतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
ताजी बातमी
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
चर्चेत असलेला विषय
औरंगाबादमधील 30-30 घोटाळ्याप्रकरणी संतोष राठोडला अटक; फसवणुकीचा आरोप, घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधींची
औरंगाबाद : मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या 'तीस-तीस' घोटाळ्यातून लोकांची फसवणूक करणाऱ्या संतोष उर्फ सचिन राठोडला पोलिसांनी अटक केली आहे. तीस-तीस...
टिव्ही न्यूजमेकर्स टुडे: राखी सावंतने पती आदिलची खरडपट्टी काढली, उर्फी जावेदने स्वतःला एक आकर्षक...
आज खूप व्यस्त आहात आणि टेली लँडवरील अद्यतने चुकवली आहेत? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला TV Newsmakers...
मक्काहून मदीनाला जाणाऱ्या ४५ भारतीयांचा मृत्यू: उमराह यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस डिझेल टँकरला धडकली...
सोमवारी रात्री उशिरा सौदी अरेबियात झालेल्या एका रस्ते अपघातात पंचेचाळीस भारतीयांचा मृत्यू झाला. मक्काहून मदीनाला जाणाऱ्या त्यांच्या...
इंदूरहून अमळनेरकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू
भोपाळ : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील खलघाट येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली बस नर्मदा नदीत कोसळून झालेल्या अपघातात 13...











