प्रचंड घबाड सापडले: माजी IPS अधिकाऱ्याच्या घरावर छापा ; अफाट सोने,दागिने, कॅश..मोजताना मशिनही हँग.

प्रचंड घबाड सापडले: माजी IPS अधिकाऱ्याच्या घरावर छापा ; अफाट सोने,दागिने, कॅश..मोजताना मशिनही हँग

3 फेब्रुवारी 2022: मागील काही दिवसांपासून आयकर विभाग विविध ठिकाणी छापेमारी करत आहे. विविध ठिकाणी प्रचंड घबाड सापडले आहे.

नुकतेच उत्तर प्रदेशमधील धाडींमध्ये व्यावसायिक पीयुष जैन आणि पुष्पराज जैन यांच्या घरात प्रचंड घबाड सापडल्याचे घटना ताज्या असतानाच आता आयपीएस अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकल्याचे आणखी एक वृत्त आले आहे. आयपीएस राम नारायण सिंह यांच्या घरावर ही धाड पडली आहे.

सिंह यांच्या घराची झडती घेत असताना आयकर विभागाला ६५० लॉकर आढळून आले. यातल्या एका लॉकरमध्ये सोन्याची वीट सापडली. विशेष म्हणजे या दागिन्यांवर, रोख रकमेवर दावा सांगण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेलं नाही. सोन्याची विटेची किंमत ४५ लाख रुपये आहे.तर उर्वरित दागिन्यांची किंमत दीड कोटी रुपयांची आसपास आहे. सिंह यांच्या घरातून हिरे, मोती, चांदी, सोन्याचे दागिने ताब्यात घेण्यात आले आहेत. याआधी आयकर विभागाला लॉकरमधून जवळपास ६ कोटी रुपये मिळाले होते.

ही रक्कम मोजताना आयकर विभागानं आणलेल्या मशीन हँग झाल्या. राम नारायण सिंह उत्तर प्रदेश कॅडर आणि 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी.

डीजी रँकवर त्यांची निवृत्ती झाली. सेक्टर 50 मध्ये असणाऱ्या त्यांच्या घरात मुलगा सुयश हा त्याच्या कुटुंबासमवेत राहतो. तर, खुद्द सिंह मिर्झापूरला राहतात. असं म्हटलं जातं की सिंह यांची पत्नी ‘मानसम कंपनी’ नावाची एक कंपनी चालवतात.जी नागरिकांना भाडेतत्वावर लॉकर देते. हे त्यांचं जुनं काम असल्याचं कळत आहे.इथं लॉकर देणाऱ्यांचा केवायसी मिळालेले नाहीत.

ही माहिती सुयश सिंह यांच्या नावे व्हायरल होणाऱ्या पत्रातून समोर आली आहे.आपण इनकम टॅक्स विभागाला आवश्यक ती कादगपत्र दिली आहेत.

शिवाय त्यांनीही यावर कोणती हरकत दर्शवली नाही असं या पत्रात म्हटलं गेलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here