आणखी कोणाचा संबंध?
शेवगाव तहसिलदार कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका लिपिकाला पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे.
वाळूच्या गाड्या सोडण्याची ही लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
तालुक्यातील वाळू व्यावसायात मोठ्या प्रमाणावर तरुणही उतरले आहेत.त्यातील अनेकांचे यंत्रणेशी अर्थपूर्ण संबंध आहेत, तर काहींना यंत्रणेकडून त्रास दिल्याच्या तक्रार केल्या जातात.
एका लिपिकाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.युवकांनी त्याला पकडून देण्याचा निर्धार करून नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
ठरल्यानुसार लाचेच्या रकमेपैकी ५० हजार रुपये स्वीकारताना तहसिलदार कार्यालयाच्या आवारात लिपिकाला पकडण्यात आले.
यासंबंधीची कारवाई अद्याप सुरू आहे. मात्र, एवढी मोठी रक्कम लिपिक स्वत:साठी घेत होता की यात आणखी कोणी सहभागी आहे, याचा तपास पथक करीत आहे.