नेवासे तालुक्यात भाजपला लागलेली गळती कमी होण्याचे काही नाव घेताना दिसून घेत नाही. राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत नेवासे बुद्रुक जोगेश्वरी आखाडा येथील भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला असून बाळासाहेब मुरकुटे यांची घसरत असलेली राजकारणाची पातळी हे कारण सांगत अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झालेले आहेत. नेवासे बुद्रुक परिसरात जोगेश्वरी आखाडा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मात्र येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि आणि इतर पदाधिकारी यांच्यातील वाद विकोपाला गेलेला असून अखेर निष्ठावंत भाजप कार्यकर्ते यांनी चांगला पर्याय म्हणून मंत्री गडाख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. भाजप कार्यकर्ते सुभाष दळवी, धनंजय माळवदे शिवा गावडे, चंद्रकांत पिंपळे, दादा गावडे, सुनील गावडे, संतोष जाधव, मधुकर कोकणे, नामदेव पिंपळे, राजू थावरे यांच्यासह 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजप सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
‘राहुल गांधींचा वैयक्तिक कायदेशीर लढा कसा बनतो…’ ज्योतिरादित्य सिंधिया
राहुल गांधींचा वैयक्तिक कायदेशीर लढा लोकशाहीचा लढा म्हणून काँग्रेस का दाखवत आहे, असा सवाल केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य...
‘अपरिवर्तनीय ब्रेकडाउन’च्या आधारावर विवाह विरघळू शकतो, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे
सोमवारी एका घटनापीठाने निर्णय दिला की, वैवाहिक कायद्यांतर्गत आवश्यकतेनुसार प्रतीक्षा कालावधीची आवश्यकता पूर्ण करून सर्वोच्च न्यायालय अपरिवर्तनीय...
ब्लड कॅन्सरच्या ज्या रुग्णांवर कोणतेही उपचार काम करत नाही,
ब्लड कॅन्सरच्या ज्या रुग्णांवर कोणतेही उपचार काम करत नाही, अशा रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या NEXCAR19 या उपचार...
आरपीएन सिंह, सुधांशू त्रिवेदी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांमध्ये
भारतीय जनता पक्षाने रविवारी 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांची यादी जाहीर केली. 15 राज्यांमधील...









