नगर जिल्ह्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

नगर जिल्ह्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका, दोघांवर गुन्हा दाखल

नगर: पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून राहुरी खुर्द येथील एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यातून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी राहुरी व श्रीरामपूर येथील दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी टाकलेल्या नियोजनबद्ध धाडसी छाप्यामुळे राहुरीत अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

हा छापा बुधवारी (१२ जानेवारी २०२२)रात्रीच्या सुमारास टाकण्यात आला.हॉटेलात वेश्याव्यवसाय चालू असल्याची गोपनीय खबर पोलिस उपअधीक्षक  संदीप मिटके यांना मिळाली.

राहुरीतील हॉटेल न्यू भारत तसेच राहुरी ते शिर्डी रोडवरील हॉटेल न्यू प्रसादच्या शेजारी वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

त्याप्रमाणे राहुरी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकून तीन पीडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here