.लंकेश पराजी चिताळकर असे तरुणाचे नाव आत्महत्येचे कारण अस्पष्ट!उपचारा दरम्यान प्राण ज्योत मालवली.नेवासा प्रतिनिधी- संभाजीनगर(Sambhajinagar) महामार्गावरील बाभूळवेढे शिवारातील शनी चौथऱयाजवळ कारचालकाने चालत्या गाडीत स्वतःला पेटवून घेण्याची घटना मंगळवारी पहाटे घडली आहे. यात कार जळून खाक झाली असून, चालक जखमी झाला आहे.लंकेश पराजी चिताळकर(Lankesh Paraji Chitalkar) असे जखमी चालकाचे नाव आहे. 
चालक 20 टक्के भाजल्याने त्याला सुरुवातीला नगर आणि नंतर पुण्यात हलविण्यात आले होते. उपचारा दरम्यान प्राण ज्योत मालवली.दरम्यान, लंकेशने स्वतःला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण समजू शकले नाही.










