जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाचा २४ मे रोजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयात निकाल आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी दिली आहे.
घटनेची प्राथमिक माहिती
दि. 21 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे खालसा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच दलित कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
मयत व्यक्ती पती-पत्नी व मुलगा होते. याप्रकरणी मयत संजय जाधव यांचा पुतण्या प्रशांत दिलीप जाधव याने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपींच्या वकिलांनी केलेल्या बचावाच्या युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी 71 पानांचे लेखी युक्तीवाद करून उत्तर दिले आहे. जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत मेलवर हा युक्तीवाद पाठविला आहे.
आरोपींच्या वकिलांनी 12 दिवस बचावाचा युक्तीवाद केला होता.जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपींच्या वकिलांनी केलेल्या बचावाच्या युक्तीवादाला विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी 71 पानांचे लेखी युक्तीवाद करून उत्तर दिले आहे.
जिल्हा न्यायालयाच्या अधिकृत मेलवर हा युक्तीवाद पाठविला आहे. आरोपींच्या वकिलांनी 12 दिवस बचावाचा युक्तीवाद केला होता.