औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला
सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील घडला गुन्हा
आरोपीविरोधात गुन्हा दाखल

सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती.

औरंगाबादः राज्य सरकारने एकिकडे भोंगे (Loudspeakers) हटवायचे की नाही, यावरून भूमिका स्पष्ट केली तर इकडे औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील सातारा पोलीस स्टेशनच्या (Satara police station) हद्दीत भोंग्यांवरून दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडल्याने पोलिसांनी (Aurangabad police) तत्काळ कारवाई करत एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मशिदीकडे भोंग्याचे तोंड वरून त्यावर गाणे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे.

03 मे पूर्वी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अधिकृत घेण्यासंदर्भातील आदेश जारी केले होते.

त्यानंतरही सातारा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

काय घडली घटना?
नुकत्याच घडलेल्या या घटनेत प्राथमिक स्तरावर हाती आलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने मिशीदीकडे तोंड करून अशा प्रकारचे भोंगे लावून गाणे वाजवले होते.
या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांनी आता कारवाई केली आहे.

सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले. यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती.औरंगाबादः राज्य सरकारने एकिकडे भोंगे (Loudspeakers) हटवायचे की नाही, यावरून भूमिका स्पष्ट केली तर इकडे औरंगाबादेत भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील सातारा पोलीस स्टेशनच्या (Satara police station) हद्दीत भोंग्यांवरून दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना घडल्याने पोलिसांनी (Aurangabad police) तत्काळ कारवाई करत एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मशिदीकडे भोंग्याचे तोंड वरून त्यावर गाणे वाजवल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती हाती आली आहे. 03 मे पूर्वी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी सर्वच धार्मिक स्थळांवरील भोंगे अधिकृत घेण्यासंदर्भातील आदेश जारी केले होते.

त्यानंतरही सातारा पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केल्याचे दिसून येत आहे.

काय घडली घटना?

नुकत्याच घडलेल्या या घटनेत प्राथमिक स्तरावर हाती आलेल्या माहितीनुसार, सातारा पोलीस स्टेशन हद्दीतील मशिदीकडे भोंग्याचे तोंड करून एकाने गाणे वाजवले.

यामुळे दोन समजात तेढ आणि वादाची स्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

रेल्वे पोलीस दलातील कर्मचाऱ्याने मिशीदीकडे तोंड करून अशा प्रकारचे भोंगे लावून गाणे वाजवले होते. या कर्मचाऱ्याविरोधात पोलिसांनी आता कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here