मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर झालेलया हल्ल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्याच ताब्यात असलेल्या गृहखात्याला चांगलेच झोडपलेय.
शरद पवार यांच्या बाबत जे घडले ते कुणाही बाबत होता कामा नये. मग तो आमचा सर्वसामान्य नागरिक असो, कुठल्याही पक्षाचा नेता व कार्यकर्ता असतो किंवा स्वतंत्र विचाराचा व्यक्ती असो, अशी घटना घडता कामा नये.आपली महाराष्ट्राची परंपरा, शिकवण आहे की लोकशाही मार्गाने आपला निषेध करावा.
गावदेवी (मुंबई)पोलीस स्टेशनमध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज झालेल्या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे. त्यामुळे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 B समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय दंड विधान १४१, १४९, ३५३, ३३२, ४५२, १२० ब आणि ४४८ आदी कलमांच्या आधारे गुणरत्ने यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हल्ला घडवून आणणे, कट रचणे, सरकारी कर्मचारी मारहाण आदींचा त्यात समावेश आहे. या संदर्भातील भाषणं पोलिसांना मिळाली आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांच्या पथकाने रात्री आठच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची तब्बल दीड ते दोन तास गावदेवी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास अटक करण्याचा निर्णय घेतला.