अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेप अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश एम एस शेख यांनी एका युवकाला जन्मठेप आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे
सर्फराज इक्बाल शेख ( वय 19 राहणार बोरावके नगर दौंड जिल्हा पुणे ) असे आरोपीचे नाव असून त्याचा भाऊ असलेला दुसरा आरोपी अरबाज भैय्या खान याला देखील एक वर्षाची सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित मुलगी घरी एकटी असताना तिचा चुलत भाऊ अरबाज भैय्या खान हा त्याचा मावसभाऊ असलेला आरोपी सर्फराज इक्बाल शेख याला घरी घेऊन आला आणि पीडितेची सरफराज शेख यांच्यासोबत ओळख करून दिली त्यावेळी सरफराज याने ‘ मला तू फार आवडतेस.
माझ्यासोबत प्रेम कर ‘ असे म्हणाला मात्र पीडितेने त्याला नकार दिला त्यानंतर दुसरा आरोपी अरबाज याने ‘ तू जर सर्फराज सोबत प्रेम केले नाही तर त्याचे आणि तुझे अफेयर आहे असे तुझ्या आई-वडिलांना सांगेल ‘, असे तो म्हणाला त्यानंतर ते दोघे पीडित मुलीला घेऊन त्याच्या घरी गेले आणि सर्फराज याने पीडित मुलीवर अत्याचार केला.
अत्याचार केल्यानंतर तू जर तुझ्या आई-वडिलांना काही सांगितले तर तुला ठार मारेन अशी देखील धमकी त्याने दिली. काही कालावधी गेल्यानंतर मार्च 2021 मध्ये आरोपी सरफराज याने पीडित मुलीवर अत्याचार केला त्यावेळी देखील तिने कोणाला काही सांगितले नाही मात्र बरेच दिवस मुलीची मासिक पाळी न आल्याने आईला शंका आली म्हणून त्यांनी तपासणी केली असता पिडीत मुलगी गर्भवती असल्याचे आढळून आले.
चाईल्ड लाईन सदस्यांनी धीर दिल्यानंतर आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक अमित माळी यांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले त्यानंतर त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने सरफराज याला मरेपर्यंत जन्मठेप आणि दुसरा आरोपी असलेला अरबाज याला एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षाच्या वतीने पुष्पा गायके यांनी काम पाहिले.