मुंबई:
अनिल देशमुख यांना चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लिनचिट
अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांनी केलेले आरोप खोटे, चांदीवाल अहवालात स्पष्ट
चांदीवाल आयोगाने चौकशी करून आपला अहवाल तयार केला. हा अहवाल आयोगाने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे दिला. त्यांनतर गृहमंत्री वळसे पाटील यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा अहवाल त्यांच्याकडे सुपूर्द केला.चांदीवाल आयोगाने मागील महिन्यात चौकशी पूर्ण केली. आयोगाने केलेल्या चौकशीच्या आधारे सुमारे 200 पानांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयोगाने आपल्या अहवालात देशमुख यांना क्लिनचिट दिल्याचे समजते.











