मुकुंदनगर येथील डेंटल कॉर्नर अँड इनप्लांट सेंटर येथे मोफत दंतरोग तपासणी शिबिर
७५ व्या देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम…नगर प्रतिनिधी – मुकुंदनगर येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये असलेल्या डेंटल कॉर्नर अँड इनप्लांट सेंटर येथे 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त रुग्णांसाठी मोफत दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले दंतरोग तज्ञ डॉ. अहद शेख व डॉ.आलिया शेख यांच्यावतीने या शिबिराच्या आयोजन करण्यात आले. सध्याच्या युगामध्ये मनुष्य आपल्या दाताच्या आजारांकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे दाताच्या विविध आजारांना रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, दाताची निगा कशाप्रकारे राखायची दाताच्या आजारा संदर्भात काही समस्या उद्भवल्यास कशाप्रकारे उपचार केले पाहिजे या सर्वांवर रुग्णांना मोफत तपासणी करून दंतरोगतज्ञ डॉ. अहद शेख व डॉ. आलिया शेख मार्गदर्शन केले सदर शिबिरामध्ये दंतरोगा संदर्भात असलेल्या तपासणी तपासण्या मोफत करण्यात आल्या सुमारे १५० पेक्षा जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला या सर्व रुग्णांना चिस्ती मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून मोफत उपचारासाठी लागलेल्या औषध उपलब्ध करून देण्यात आले.











